राज्य कबड्डी संघटनेचे पुरस्कार जाहीर; दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, दै.‘सामना’च्या मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपले क्रीडा पुरस्कार आज जाहीर केले आहेत. कबड्डीमधील भरीव योगदानासाठी दिनकर पाटील आणि शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर कबड्डीपटूंविरोधातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आणि कबड्डीबाबत लिखाण करणाऱ्या दै. ‘सामना’च्या मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कबड्डी दिनाचे औचित्य साधत येत्या 15 जुलैला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने दुपारी 3 वाजता रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
कबड्डी दिन पुरस्कार विजेते
कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार – दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे).
पत्रकार – मंगेश वरवडेकर (दैनिक सामना), अल्ताफ कडाकाळे (दैनिक सकाळ)
ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार – आत्माराम घेगडे, बंडू कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत.
ज्येष्ठ पंच पुरस्कार – प्रकाश मोरे, रवींद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मीक बागुल, मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे.
ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार – सुरेश मोरे, शशिकांत कोरगावकर, रवींद्र लवेकर, तुळसीदास रोकडे, ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवाड.
रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार – दीपक कांदळगावकर (उपनगर), डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर)
कृतज्ञता पुरस्कार– निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे.
फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक – नारायण गायकवाड (ठाणे), सुहास कदम (मुंबई उपनगर).
किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते
किशोर गट – सूरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर).
किशोरी गट – आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर), कुमार गट ः शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी).
कुमारी गट – संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील (सांगली).
किशोर–किशोरी गट शिष्यवृत्ती – दीपराज कांबळे (परभणी), मैत्री इंगळे (सातारा)
सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार – सौरभ राऊत (अहिल्यानगर), यामिका पुजारी (मुंबई उपनगर)
उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार – शिवम पठारे, (अहिल्यानगर), निकिता पडवळ (पुणे).
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व
कुमार गट – प्रसाद दिलीप (पुणे)
कुमारी गट – सेरेना म्हस्कर (मुंबई उपनगर)
प्रथम जिल्हा संघ पुरस्कार – अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटना
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा – नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व सह्याद्री युवा मंच सिन्नर, नाशिक.
Comments are closed.