जुहूत लाखमोलाची कॅरम स्पर्धा

जुहू विले पार्ले जिमखाना तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने येत्या 16 ते 18 ऑगस्टदरम्यान जुहू विलेपार्ले जिमखाना येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांत ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या 8 खेळाडूंना मिळून एपंदर 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे सायंकाळी 6 ते 8 दरम्यान उपलब्ध असून इच्छुकांना 6 ऑगस्टपर्यंत नावे नोंदवता येतील. अधिक माहितीसाठी  9987045429 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.