शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलन; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकर्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
पाण्याखाली, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे शेतकर्यांच्या आंदोलनाचा ‘नांगर’ टाकण्याची घोषणा भाऊबिजेच्या मुहूर्तावर केली. शेतकऱ्यांसाठी हमीभाव, कर्जमुक्ती, कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करण्यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन उभे करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
भाऊबीजेच्या दिवशी नुकसानीच्या याद्या तयार करत आहोत आणि लवकरच बैठक घेऊन राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांसाठी काम करणारे अभ्यासक, तज्ज्ञ आणि नेते यांना एकत्र बोलावून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे मनोज जरांगे म्हणाले.
ओबीसी आरक्षणावरून सरकारला इशारा
ओबीसींना म्हणायचे, तुमच्या आरक्षणाला हात लागला नाही आणि इकडे आम्हाला जीआर द्यायचा, पण प्रमाणपत्र द्यायचे नाहीत. जर आमचा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही, तर तुमचासुद्धा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या. मराठा आरक्षणाच्या जीआरला धक्का लागल्यास आंदोलन कोणत्याही दिशेला जाऊ शकते, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

Comments are closed.