अखेर 22 वर्षानंतर मान्य केली चूक, माफिही मागितली! सचिनला बाद देण्याचा स्टीव्ह बकनर यांना पश्चाताप

आजच्या काळातील क्रिकेट चाहत्यांना वेस्ट इंडिजचे वरिष्ठ पंच स्टीव्ह बकनर यांचा भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर काय परिणाम झाला याबाबत कल्पना नसेल. ७९ वर्षाचे बकनर हे त्यांच्या काळात नावाजलेले पंच होते. त्यांनी १२० कसोटी आणि अनेक विश्वचषकांमध्ये पंचाची जबाबदारी पार पाडली आहे. असे असले तरी त्यांनी सचिनला दिलेल्या चूकीच्या निर्णयांच्या चर्चा आजही केल्या जातात.

बकनर यांनी सचिनला एकदा नाहीतर अनेकदा चुकीचे बाद दिले होते. त्यामधील एक निर्णय सर्वात खळबळजनक ठरला, तो आजही चाहते विसरू शकत नाही. तो निर्णय चुकला हे बकनर यांनीही आता मान्य केले आहे.

भारत २००३-०४मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यामध्ये गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात सर्वात मोठा वाद निर्माण झाला. त्यावेळी सचिन त्याच्या कामगिरीच्या शिखरावर होता, मात्र जेसन गिलेस्पी, विकेटकीपर-फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट आणि ऑस्ट्रेलियन संघातील इतर खेळाडूंनी जोरदार आवाहन केल्यानंतर बकनरने काही सेकंदातच बोट वर केले तेव्हा तो पहिल्या डावात तीन चेंडूत शून्यावर बाद झाला.

चेंडू स्टम्पच्या खूपच वरून जात आहे, असे त्या विकेटच्या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. तेव्हा सचिनही चकित झाला होता, मात्र त्यांने त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. २००५ला सिडनीमध्ये झालेल्या एका सामन्यातही असेच घडले. तेव्हा त्यांनी सचिनला अब्दुल रज्जाकच्या चेंडूवर झेलबाद निर्णय दिला होता, तो चेंडू बॅटच्या खूपच दूर होता असे असतानाही सचिन बाद झाला.

बकनर म्हणाले, “मी दोन खूप मोठ्या चूका केल्या. त्यातील पहिली चूक जेव्हा चेंडू स्टम्प्सच्या वरून गेला आणि दुसरी चूक चेंडू बॅटला लागलाच नाही. ऑस्ट्रेलियात सचिनला बाद दिलेला तो निर्णय मला माझ्या कारकिर्दीत कायम लक्षात राहिल आणि त्याला मी सुधारू इच्छितो.”

बकनर यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट पंच असोसिएशनला दिलेल्या मुलाखतीत सचिनला बाद दिल्याची चूक झाली, असे सांगितले आहे.

Comments are closed.