रवींद्र जडेजाला वनडे मालिकेत का स्थान मिळालं नाही? मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांनी सांगितलं कारण
शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संपलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 110 धावांनी विजय मिळवला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) प्लेयर ऑफ द मॅच ठरला. जडेजाने नाबाद 104 धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये देखील 4 विकेट घेतल्या. तरीही, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जाहीर झालेल्या वनडे टीममध्ये त्याचं नाव नसल्यामुळे चाहत्यांना आणि तज्ज्ञांना प्रश्न पडणे साहजिकच होते.
ऑस्ट्रेलियासाठी वनडे फॉर्मॅटमध्ये दोन्ही टीम जाहीर करताना मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) म्हणाले की, जडेजा जरी संघात नसला , तरीही तो भारताच्या वनडे रणनीतीचा भाग आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये विजयी धावा करणारा जडेजा, ऑस्ट्रेलियातील परिस्थिती लक्षात घेऊन 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत टीममध्ये समाविष्ट नाही.
आगरकर म्हणाले, ऑस्ट्रेलियामध्ये दोन फिरकीपटू घेणं शक्य नाही, पण तो रणनीतीचा भाग आहे. टीममध्ये जागेसाठी स्पर्धा नक्कीच असेल. तो चॅम्पियन्स ट्रॉफी टीममध्ये होता कारण तिथे अतिरिक्त फिरकीपटूंची गरज होती. पण येथे एकच फिरकीपटू पुरेसा आहे, ज्यामुळे टीममध्ये संतुलन राहील.
आगरकर पुढे म्हणाले, टीममध्ये वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आहेत, त्यामुळे त्यापेक्षा जास्त फिरकीपटूंची गरज नाही. पण जडेजा रणनीतीचा भाग आहे कारण तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील उपयोगी आहे.
त्यांनी सांगितले की, आशिया कप फायनल पूर्वी दुखापत झालेल्या (Hardik Pandya) हार्दिक पांड्याचा रिहॅबिलिटेशन सुरु होईल. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट नाही. वेळेनुसार कळेल तो किती काळ बाहेर राहील.
आगरकर म्हणाले की, तिलक वर्मा (Tilak Varma) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) वनडे टीममध्ये येण्यास जवळ आहेत, पण सध्या टॉप ऑर्डर निश्चित आहे. रोहित आणि शुबमन (Rohit Sharma & Shubman gill) डावाची सुरुवात करतील. यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आहे. लोक विसरतात की तो किती उत्कृष्ट खेळाडू आहे. तिलक देखील जवळपास आहे. आम्ही फक्त 15 खेळाडू घेऊ कारण ही फक्त तीन सामन्यांची मालिका आहे. कसोटी सारखी नाही जिथे अतिरिक्त खेळाडू घेता येतात.
आगरकरांनी असेही सांगितले की, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांचा वर्कलोड व्यवस्थापनाचेही लक्ष ठेवले जाईल. बुमराहला ऑस्ट्रेलियामध्ये वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
Comments are closed.