आयपीएल 2026 मध्ये MI सोडून KKR मध्ये खेळणार रोहित शर्मा? डिसेंबर मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट समोर
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (Ind vs aus) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर आता IPL 2026 चर्चा सुरू झाली आहे. केकेआर (KKR) लवकरच आपला नवीन हेड कोच जाहीर करणार आहे, आणि या बदलासोबतच रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी हंगामपासून केकेआरच्या संघात सामील होऊ होण्याची शक्यता आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, केकेआर अभिषेक नायर यांना (Abhishek Nayar) हेड कोच बनवू शकते. अभिषेक आणि रोहित चांगले मित्र असून मुंबईत एकत्र फिटनेस आणि प्रशिक्षण घेतात. रोहित नेहमी अभिषेकच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना दिसतो आणि IPL 2026 साठी तो केकेआरमध्ये सामील होण्याची शक्यता वाढलेली दिसून येते.
पूर्वी रोहितने केकेआरच्या कर्णधारपदाची इच्छा व्यक्त केली होती, कारण ईडन गार्डन्स हे त्याचे आवडते मैदान आहे. IPL 2026 मध्ये केकेआरकडे सध्या मजबूत कर्णधार नाही, त्यामुळे फ्रेंचायझी त्याला कर्णधार म्हणून घेऊ शकते.
Comments are closed.