शेअर बाजाराची ‘बुल रन’ सुरू; गुंतवणूकदारांची 7 लाख कोटींची कमाई

शेअर बाजार ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने घसरत होता. सोमवारी बाजारात थोडी तेजी दिसून आली. मंगळवारी बाजारात आलेल्या प्रचंड तेजीमुळे शेअर बाजाराची बुल रन आता सुरू झाली आहे, अशी भावना बाजारातील अनेकांनी व्यक्त केली आहे. बाजाराच्या या बुल रनमुळे गुतंवणूकदारांची तब्बल 7 लाख कोटींची कमाई झाली आहे. मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड तेजी दिसून आली. बाजारात सुरू होताच त्यात तेजी होती. तसेच मुंबई शएअर बाजराचा निर्देशांक सेन्सेक्स 1100 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टीही 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 22,834.30 वर बंद झाला. त्यात 325.55 अकांची वाढ झाली आहे.

गेल्या पाच महिन्याच्या घसरणीचा छोट्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदरांचे 90 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. मॅक्रो इकॉनॉमिक डेटामुळे बाजारात तेजी आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आता सेन्सेक्सने पुन्हा एकदा 75 हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारात बुल रन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 1100 पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली आणि निफ्टी 22,834.30 वर बंद झाला. फायनान्शियल, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून आली.

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक 1.53 टक्क्यांनी वाढून 75,301.26 वर बंद झाला. तर निफ्टी 1.45 टक्क्यांनी वाढून 22,834.30 वर बंद झाला. झोमॅटो, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि एल अँड टी या कंपन्याच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 7,09,003.57 कोटी रुपयांनी वाढून 400.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. या आठवड्यात यूएस फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंड कोणते प्रमुख धोरणात्मक निर्णय घेतील यावर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष आहे, ज्यामुळे व्याजदर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. याचे निकाल बाजारासाठी सकारात्मक असल्यास बाजाराची बुल रन सुरू होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Comments are closed.