Share Market News – ट्रम्प यांच्या संबोधनानंतर शेअर बाजार भूईसपाट; सेन्सेक्स, निफ्टी डेंजर झोनमध्ये
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध शमणार असल्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता ट्रम्प यांच्या सोंबधनानंतर जगाची चिंता वाढली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून त्यांनी 105 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यातच यामुळे जागतिक शेअर बाजारासह हिंदुस्थानी शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.
भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या भाषणानंतर गुरुवारी बाजाराला सुरुवात होताच सेन्सेक्स १५०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला, तर निफ्टी जवळपास ५०० अंकांच्या घसरणीसह उघडला. बँक निफ्टीमध्येही जवळपास १,५०० अंकांची घसरण झाली. बीएसईमधील एकही स्टॉक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत नव्हता.
बाजाराला सुरुवात होताच सकाळी ९:२५ वाजता सेन्सेक्स १,४७८ अंकांनी म्हणजेच २% ने घसरून ७१,६०० वर आला. निफ्टी ४४० अंकांनी, म्हणजेच २% ने घसरून २२,२५० च्या खाली व्यवहार करत होता. निफ्टी बँकमध्येही १,५०० हून अधिक अंकांची घसरण झाली. बीएसईमधील एचसीएल टेक वगळता इतर सर्व स्टॉक्स घसरले. सन फार्मा (४.५९%), इंडिगो (४%) आणि अदानी पोर्ट्स (३.६०%) यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. गुरुवारी या किमती जवळपास ५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०६ डॉलरच्या वर पोहोचल्या. कालपासून आजपर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत ८ डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारातील घसरण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.