अर्थवृत्त – शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’

शेअर बाजारात सलग दोन दिवस वाढ पाहायला मिळाल्यानंतर शुक्रवारी मात्र शेअर बाजार दणाणून आपटला. शुक्रवारी शेअर बाजार जबरदस्त कोसळल्याने गुंतवणूकदारांना जबर फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1690 अंकांनी घसरून 73,588 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 486 अंकांनी घसरून 22,891 अंकांवर बंद झाला. 24 आणि 25 मार्चला शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी झाली होती. यामुळे 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. 27 मार्चला गुंतवणूकदारांनी नफेवसुली केल्याने बाजारात पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजार घसरणीमागे अनेक कारणे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा केंद्रांवरील हल्ल्याला 6 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे, परंतु इराणकडून कोणतीही नरमाईची भूमिका दिसली नाही.

गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचे नुकसान

शुक्रवारी गुंतवणूकदारांना जबर दणका बसला. बुधवारी बीएसई मार्पेट कॅपिटलायझेशन 431 लाख कोटी रुपये होते. ते शुक्रवारी कमी होऊन 424 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना जवळपास 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी यात 9 लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.

क्विक हिलचा उपक्रम

क्विक हिल टेक्नॉलॉजीजच्या सीएसआर शाखेने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षाः फ्युचर प्रूफ 2025-26’ अहवाल सादर केला. सायबर सुरक्षा सर्वेक्षण आधी व नंतर केलेल्या मूल्यमापनाच्या रचनेवर आधारित आहे.

पल्स 2026 परिषद

पल्स 2026 ही परिषद विकसित देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेत 130 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ, 20 सत्रे आणि 2900 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही परिषद 28 मार्चपर्यंत आहे.

डॉल्फिन टाकी

सलाम बॉम्बे फाऊंडेशनने एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या सहकार्याने उद्योजकता मंच ‘डॉल्फिन टँकी’ची पाचवी आवृत्ती आयोजित केली. या कार्यक्रमात ब्युटी अँड वेलनेस, मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी, व्हिडीओ एडिटिंग सादर केल्या.

कर्ज करारावर स्वाक्षरी

मुंबई मेट्रो मार्ग 11 प्रकल्प (1) साठी 5500 कोटींचे जपानी अधिकृत विकास सहाय्य कर्ज देण्यासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) भारत सरकारसोबत कर्ज करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी डॉ. आलोक तिवारी उपस्थित होते.

ग्रीन एनर्जी लिमिटेडला इकोव्हॅडिस ब्रॉन्झ मेडल

एकात्मिक अक्षय ऊर्जा कंपन्यांपैकी एक सात्त्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध असून कंपनीला इकोव्हॅडिसतर्फे ब्रॉन्झ मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असून सात्त्विकला इकोव्हॅडिसकडून मिळालेला हा पहिला सन्मान आहे. सात्त्विकने 69/100 गुण मिळवून जागतिक स्तरावर कंपन्यांमध्ये 79 व्या पर्सेंटाइलमध्ये स्थान मिळवले आहे.

फ्रँकलिन इंडिया मनी मार्केट फंड

फ्रँकलिन इंडिया मनी मार्पेट फंडाने आपल्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त निधी व्यवस्थापनात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या फंडातील एकूण गुंतवणूक निधीने (एयूएम) 3,800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या फंडाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटविला आहे. फ्रँकलिन इंडिया मनी मार्पेट फंड ही ‘मुदत मुक्त’ श्रेणीतील डेट फंड योजना आहे.

राजस्थान रॉयल्ससह HMDC भागीदारी

राजस्थान रॉयल्ससोबतची आपली भागीदारी सुरूच ठेवण्याची आणि ती अधिक वाढवण्याची घोषणा एचएमडीने केली. केवळ स्मार्टफोन भागीदार होण्यापेक्षा आता एचएमडी थेट सह प्रायोजक म्हणून त्यांच्यासोबत राहणार आहे. या यशस्वी सहकार्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या प्रायोजकत्व यामुळे हेल्मेटच्या मागील बाजूस एचएमडीचे ब्रँडिंग असेल.

एनएमआयएचे पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए)ने आपले पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. 29 मार्च ते 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू होणाऱ्या या वेळापत्रकामुळे विमानतळाचे देशांतर्गत नेटवर्क 46 शहरांपर्यंत विस्तारणार आहे. या वेळापत्रकात 30 नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यासह हे विमानतळ भारतातील व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक पेंद्रांशी जोडले जाईल. भारतातील दिल्ली (9), गोवा (7), बंगळुरू (6) आणि कोचीन (5) या शहरांतून सर्वाधिक दैनंदिन उड्डाणे होतील. यानंतर हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदौर या शहरांचा क्रमांक असेल.

क्रॉम्प्टनचे अमिओ फ्रेश कोल्ड प्रेस ज्यूसर लाँच

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक इलेक्ट्रिकल ब्रँडने क्रॉम्प्टन अमिओ फ्रेश कोल्ड प्रेस ज्यूसर लाँच केला आहे. यावेळी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि.च्या स्मॉल डोमेटिस्क अप्लायन्सेसचे प्रमुख केतन चौधरी उपस्थित होते. क्रॉम्प्टन मिओ फ्रेश कोल्ड प्रेस ज्यूसर प्रमुख रिटेल आऊटलेट्स आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफार्म्सवर उपलब्ध असेल.

Comments are closed.