शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची 400 अंकांची उसळी, निफ्टी, बँक निफ्टीही वधारले

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडत असून तणावात भर पडत आहे. या घडामोडींचा शुक्रवारी शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बाजार सुरू होताच 400 अंकांनी वधारलाय वाढला. निफ्टी आणि बँकनिफ्टीही तेजीत व्यवहार करत आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाजार सुरू होताच 400 अंकांनी वाढला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही 60 अंकांच्या वाढीसह सुरू झाला. सोमवारी सेन्सेक्स 79,343.63 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 79,212.53 पेक्षा जास्त होता आणि काही वेळातच त्याने मोठी झेप घेतली आणि 79.668.58 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्सप्रमाणे, निफ्टीनेही सुरुवातीपासूनच गती कायम ठेवली. एनएसईचा हा निर्देशांक त्याच्या मागील बंद 24,039.35 वरून 24,.70.25 वर उघडला आणि नंतर थोड्या वेळाने तो 24,152.20 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या रिलायन्सचा शेअर उघडताच सुमारे 3 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपही 18.13 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी दोन्ही शेअर बाजार निर्देशांक घसरणीसह लाल रंगात बंद झाले असले तरी, संपूर्ण आठवड्यात ते नफ्यात राहिले. गेल्या शुक्रवारी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 588.90 अंकांनी घसरून 79,212.53 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 207.35 अंकांनी घसरून 24,039.35 वर बंद झाला.

Comments are closed.