इंडसइंड बँकेचे काय होणार? खातेदारांची चिंता वाढली; RBI ने दिली मोठी माहिती

शेअर बाजार सध्या दबावाखाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टी 50 आणि बँक निफ्टी यांच्या निर्देशांकां मोठी घरसण झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात खाजगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेबाबत नकारात्मक बातमी समोर आल्याने या बँकेच्या शेअरमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. या बँकेचे शेअर तबेबल 27 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( RBI) महत्त्वाची माहिती दिल्याने खातेधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असून बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 16.46% आणि तरतूद कव्हरेज प्रमाण 70.20% नोंदवले गेले. याव्यतिरिक्त, 9 मार्च 2025 पर्यंत बँकेचे तरलता कव्हरेज रेशो (LCR) 113% होते, जे 100% च्या मानकापेक्षा जास्त आहे. त्यामुळे खातेधारकांना चिंता करण्याची गरज नाही.
इंडसइंड बँकेबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन RBI ने ग्राहकांना केलं आहे. बँकेची आर्थिक स्थिती स्थिर असून रिझर्व्ह बँक त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. लोकांच्या मनातून बँकेबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने हे स्पष्टीकरण आपल्या वेबसाइटवर दिले आहे.
डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्यानंतर बँक व्यवस्थापनाला जाग आली आहे. बँकेने सध्याच्या प्रणालीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी आणि वास्तविक परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य लेखापरीक्षण टीम नियुक्त केली असल्याची माहिती आरबीआयने दिली. मध्यवर्ती बँकेने इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळाला आणि व्यवस्थापनाला या तिमाहीत (Q4FY25) सुधारात्मक कृती पूर्ण करण्याचे आणि सर्व संबंधित पक्षांना आवश्यक खुलासे करण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments are closed.