शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही तेजी; सेन्सेक्सने 82000 तर निफ्टीने 25000 चा टप्पा केला पार

जागतिक अनिश्चिततेचे सावट, अमेरिकेचा टॅरिफ आणि H1B व्हिसा यामुळे शेअर बाजार कोसळला होता. सलग 9 दिवस बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे निफ्टीचा निर्दशांक 850 अंकांनी कोसळला होता. मात्र, शुक्रवारपासून बाजाराने सावरायला सुरुवात केली होती. तसेच या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजार तेजीत व्यवहार करताना दिसत आहे.

शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी जोरदार तेजीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने ४०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ८२,००० चा टप्पा ओलांडला. तर निफ्टीही 25000 वर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बजाज फायनान्सपासून झोमॅटो आणि एचडीएफसी बँकेपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले. त्यानंतर बाजारात चांगलीच तेजी आली. सेन्सेक्स ८१,८८३.९५ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८१,७९०.१२ पेक्षा जास्त होता आणि नंतर तो वाढला, ४०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ८२,१४१.८४ वर व्यवहार करत होता. एनएसई निफ्टीने सेन्सेक्सप्रमाणेच तेजी दाखवली. निफअटी २५,०८५.३० वर उघडला, जो त्याच्या मागील बंद २५,०७७.६५ पेक्षा थोडासा वाढ होता, परंतु अचानक १०० अंकांनी वाढून २५,२०२ वर व्यवहार करत होता.

सुमारे १,२७७ कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या मागील बंदच्या तुलनेत मोठ्या वाढीसह उघडले, तर ९७९ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह उघडले. १८७ कंपन्यांचे शेअर्स फ्लॅट सुरुवात होते, म्हणजेच कोणताही बदल दिसून आला नाही. सुरुवातीच्या व्यवहारात, ओएनजीसी, बजाज फायनान्स, टाटा स्टील आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या शेअर्समध्ये होते. दरम्यान, ट्रेंट, मॅक्स हेल्थ, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस आणि श्रीराम फायनान्स सारख्या शेअर्सची सुरुवात खराब झाली. मात्र, सकाळी 11 नंतर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची चाल थोडी मंदावल्याचे दिसत आहे.

Comments are closed.