शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार

दिवाळीनिमित्त हिंदुस्थानी शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी शेअर बाजार सुरू राहणार असून 21 आणि 22 ऑक्टोबर असे दोन दिवस शेअर बाजार बंद ठेवला जाणार आहे. 21 ऑक्टोबरला मार्केट केवळ एका तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुले राहील. शेअर बाजाराची सुट्टी ही गुंतवणूकदार, ट्रेडर्ससाठी खास आहे. 21 ऑक्टोबरला दिवाळी, तर 22 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा असल्याने शेअर बाजार बंद ठेवला जाणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगवेळी प्री ओपन शेअर दुपारी 1.30 ते 1.45 वाजेपर्यंत चालेल. यानंतर ट्रेडिंग विंडो दुपारी 1.45 ते 2.45 वाजेपर्यंत चालेल.
Comments are closed.