संघाच्या शाखेवर दगडफेक; एपीआय शिंदे निलंबित

डोंबिवलीतील कचोरे गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल शाखेवर झालेल्या दगडफेकप्रकरणी तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.
कचोरे गावात दोन दिवसांपूर्वी ही शाखा भरली असताना अल्पवयीन मुलांनी दगडफेक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर न करता तपासात चालढकल केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Comments are closed.