अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये जोरदार दगडफेकीमुळे वातावरण तणावपूर्ण, पोलिसांनी 42 जणांना ताब्यात घेतले

अहमदाबादमध्ये दोन गटात दगडफेक अहमदाबादच्या सानंद तालुक्यात असलेल्या कलाना गावात किरकोळ वादाला हिंसक वळण लागलं, त्यामुळे दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या हिंसक हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. तातडीने कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत 42 जणांना ताब्यात घेतले आहे, तरीही परिसरात तणावाचे वातावरण आहे.
अहमदाबाद जिल्ह्यातील साणंद तालुक्यातील कलाना गावात जुन्या वैमनस्यातून दोन गटात दगडफेक झाली. सोमवारी रात्री हाणामारी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा तणाव वाढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी 42 जणांना ताब्यात घेतले. दोन गटातील जुन्या वैमनस्यातून दगडफेकीची घटना साणंद तालुक्यातील कलाणा गावात घडली. संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
बातमी अपडेट केली जात आहे…
Comments are closed.