होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार, प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ; इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचं वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारताच अत्यंत आक्रमक पवित्रा घेत अमेरिका आणि इस्रायलला उघड आव्हान दिले आहे. “होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील आणि आमच्या प्रत्येक नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील युद्धाने आता अधिक भीषण वळण घेतले आहे.

देशातील लोकांना संबोधित करताना मोजतबा खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की, इराण आता शत्रूच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जगातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझचा मार्ग बंद ठेवण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. “जोपर्यंत आमचे लक्ष्य साध्य होत नाही आणि शत्रूला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत हा मार्ग खुला केला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणवर झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत खामेनी म्हणाले की, शत्रूने सांडलेल्या इराणच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता केला जाईल. “आम्ही केवळ बचावात्मक युद्ध लढणार नाही, तर आमच्या प्रत्येक शहिदाच्या मृत्यूचा सूड घेऊ. शत्रूने आमच्यावर केलेल्या हल्ल्यांची किंमत त्यांना चुकवावीच लागेल,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

Comments are closed.