गोवेली ग्रामीण रुग्णालयाला भटक्या कुत्र्यांचा वेढा, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गोवेली ग्रामीण रुग्णालयाला सध्या भटक्या कुत्र्यांचा वेढा पडला आहे. त्याचा सर्वाधिक त्रास रुग्णालयात येणाऱ्या शाळकरी मुले आणि वृद्धांना होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासन एखादी दुर्घटना होण्याची वाट बघत आहे का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

कल्याण तालुक्यातील गोवेली येथे 1992 साली तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयात 65 गावखेड्यांमधून दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र गोवेली ग्रामीण रुग्णालयात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे काही जण पडून जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना जीव मुठीत घेऊन रुग्णालयात यावे लागत आहे. रात्रीच्यावेळी हे कुत्रे मोठमोठ्याने भुंकतात. कुत्र्यांचा उच्छाद थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भटक्या कुत्र्यांविषयी गोवेली ग्रुप ग्रामपंचायत आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांकडे भटके कुत्रे पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निवेदन दिले आहे.
डॉ. दीपलक्ष्मी मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक, गोवेली ग्रामीण रुग्णालय.

Comments are closed.