अद्ययावत मशिन्स धूळखात पडून, सुभाष देसाईंची माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

मांगावमधील उपजिल्हा रुग्णालयाला अनेक गैरसोयीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यातच गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी अचानक या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनेक अद्यावत मशिन्स तज्ज्ञांची नेमणूक केली नसल्याने धूळखात पडल्याचं निदर्शनास आलं आहे. याशिवाय रुग्णालयात औषधसाठा पुरेसला नसल्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणार असल्याचं देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुभाष देसाई म्हणाले की, ”आवश्यक औषधें डॉक्टर रुग्णांना सांगतात, पण ती औषधेच येथे नाही आहेत. सोनोग्राफीची दोन यंत्र येथे आहेत, मात्र ती यंत्र चालवणारे सक्षम डॉक्टर तिथे नाही. यामुळे जनतेला नाइलाजाने सोनोग्राफी बाहेरून करावी लागते. तर काही गरीब रुग्णांची अशी परिस्थिती आहे की, त्यांना एक एक हजार रुपये सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयात खर्च करावे लागतात, तेव्हा ते हैराण होतात. मॅमोग्राफी हे फार महत्वाचं यंत्र असून ते येथे आलं आहे. पण ज्यांनी हे यंत्र उपलब्ध करून दिलं, त्या राज्याच्या आरोग्य विभागाने ते यंत्र चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर नियुक्त केले नाहीत.”
Comments are closed.