पाणबुडी आणि युद्धनौका नौदलात सामील
‘तारागिरी‘, अरिदमन’ यांच्यामुळे वाढणार सामर्थ्य : भारताच्या संरक्षण ‘आत्मनिर्भरते’च्या कार्यक्रमालाही मोठे प्रोत्साहन मिळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वदेशनिर्मित आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिदमन’ आणि रडारवर न दिसणारी युद्धनौका ‘आयएनएस तारागिरी’ यांचा समावेश भारताच्या नौदलात करण्यात आला आहे. यामुळे नौदलाचे बळ मोठ्या प्रमाणात वाढणार असून भारताच्या संरक्षण ‘आत्मनिर्भरते’च्या कार्यक्रमालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
आयएनएस अरिदमन ही भारताची तिसरी स्वदेशनिर्मित आण्विक पाणबुडी आहे. तिच्यावरून आंतरखंडीय क्षेपणास्त्रे (बॅलेस्टिक मिसाईल्स) डागता येतात. या पाणबुडीची निर्मिती पूर्णत: भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारावर करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या दोन स्वदेशनिर्मित पाणबुड्या भारतीय नौदलात कार्यरत करण्यात आल्या आहेत. अशा आणखी 15 पाणबुड्यांची निर्मिती करण्याची योजना असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रडारवर न दिसणारी युद्धनौका
रडारवर न दिसणारी स्वदेश निर्मित युद्धनौका ‘आयएनएस तारागिरी’चेही जलावतरण करण्यात आले आहे. या नौकेच्या समावेशामुळे नौदलाची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या नौकेचीही अनेक वैशिष्ट्यो आहेत. ही नौका ‘स्टील्थ’ पद्धतीची असल्याने तिच्यावर क्षेपणास्त्र डागणे किंवा तिचे स्थान ओळखणे शत्रूला अशक्य होणार आहे, अशी माहिती नौदलाच्या वतीने देण्यात आली आहे.
एक बोट लोड…
गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने नौदल सक्षम करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. भारताला मोठा सागरतट लाभला आहे. तसेच अनेक बेटे भारताच्या सागरी क्षेत्रात आहेत. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तिन्ही क्षेत्रांमध्ये संचार करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रबळ नौदल असण्याची आवश्यकता आहे. हिंदी महासागरात चीनचा वावर वाढला आहे. त्यामुळे भारताच्या धोक्यात भर पडली आहे. परिणामी, नौदल सक्षम करण्यावर अधिक भर दिला जात आहे.
काय आहेत ‘अरिदमन’ची वैशिष्ट्यो
श्रेणी : अरिहंत- श्रेणी SSBN
वजन: साधारणपणे 6 हजार टन
प्रणोदन : 83 एमडब्ल्यू प्रेशराईज्ड वॉटर रिअॅक्टर, अमर्याद सागरी शक्ती
स्टेल्थ क्षमता : प्रगत अॅनेकॉइक टाईल्स, बो, फ्लँक, टोड एरे सोनार यंत्रणा
शस्त्रसामग्री : चार व्हर्टिकल लाँच ट्यूब्ज, 24 पर्यंत के 15 सागरिका क्षेपणास्त्र
क्षेपणास्त्राचा पल्ला 750 किलोमीटर,
3,500 किलोमीटर पल्ल्याची के-4 क्षेपणास्त्रे
निर्माण कार्य : उच्चतम स्वदेशी रचना आणि निर्मिती तंत्रज्ञान
काय आहेत ‘तारागिरी’ची वेशिष्ट्यो
वेग : तासाला 52 किलोमीटर
वजन: 3 हजार 510 टन
लांबी : 149 मीटर
रुंदी : 17.8 मीटर
तंत्रज्ञान : अत्युच्च स्टील्थ तंत्रज्ञान, रडार ठरते निकामी, विशेष साधनसामग्री
सेन्सर्स, रडार : अत्याधुनिक रडार आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा
शत्रूच्या हालचालींचा आधीच वेध घेण्याची क्षमता
शस्त्रसंभार : ब्राह्मोस ही स्वप्नातीत क्षेपणास्त्रे, आधुनिक मशिन गन्स
अत्याधुनिक पाणसुरुंग व्यवस्था, दूर अंतराची मारक क्षमता
हेलिकॉप्टर प्रणाली: नौकावर युद्ध हेलिकॉप्टर ऑपरेशन सिस्टम
बहुउपयोगी युद्धनौका : आकाशातील, पाण्यातील लक्ष्ये भेदण्याची क्षमता
पाणबुड्यांचा विनाश करण्याची क्षमता
Comments are closed.