अमित शाहंसोबत बैठक! मुनगंटीवार म्हणाले बैठकीत काय घडलं हे सार्वजनीक सांगता येणार नाही


सुधीर मुंगतीवार: दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक चांगली आणि ऊर्जा देणारी होती. अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतील मजकूर अशा पद्धतीने सार्वजनिकरित्या सांगता येत नाही असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar )  यांनी केले. दिल्लीत जाऊन सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याबाबत विचारले असता, सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही मंत्रिपदासाठी काम करत नाही. यापुर्वीही केले नाही, 15 वर्ष सत्तेबाहेर होतो असे मुनगंटीवार म्हणाले.

आज भाजपची बैठक होत आहे. याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, निवडणुकी अगोदरची ही बैठक आहे. त्यामुळं नाविन्य तुम्हाला वाटत आहे. पण त्यात काही नाविन्य नाही. रोज वेगवेगळ्या ऑनलाइन बैठका होत असतात. आमच्या बैठका मनं जिंकण्याचा दृष्टीने होत आहेत. जनतेसाठी काय करू शकतो. यासाठी काम करत असतो, जनता प्रसाद देईल तो गोड असो की कडू स्वीकारावा लागतो. जनतेच्या हितासाठी पुढे जात काम करत राहावे लागते असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

31 हजार 628 कोटींच पॅकेज कसं शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवता येईन या दृष्टीने पक्षाला काम करायचे आहे

आजच्या बैठकीत निवडणुकीवर चर्चा होईलच. पण आता शेतकरी संकटात आहे. यावर माहिती घेतली जाणार आहे. 31 हजार 628 कोटींच पॅकेज कसं शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवता येईन या दृष्टीने पक्षाला काम करायचे आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आम्ही मंत्रिपदासाठी काम करत नाही

दिल्लीत जाऊन केंदरीय गृहमंत्री अमित शाह यांची सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतली होती. याबाबत विचारले असता, सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही मंत्रिपदासाठी काम करत नाही. यापुर्वी ही केले नाही, 15 वर्ष सत्ते बाहेर होतो. सत्ताधारी लोकांनी आम्हाला आमिष दिले, पण आम्ही मंत्री होण्यासाठी गेलो नाही.आम्ही विचारासाठी सेवेसाठी काम करतो. मंत्रिपदासाठी काम करत नाही. आज उत्तर घेणारा आहे. जेव्हा उत्तर देणारा होईल तेव्हा चांगल उत्तर होईल असे मुनगंटीवार म्हणाले.

छोटी सोच आणि पाव की मोच कधी कॉंग्रेसला पुढे जाऊ देत नाही. संघाच्या विचारधारेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेकडून झाला आहे. संघ परवानगी घेऊन कार्यक्रम करतो, संघ देशभक्तीच्या विचाराने काम करतो. समर्पण सेवाभाव घेऊन काम करतो असे मुनगंटीवार म्हणाले.

धंगेकर यांनी गुंडाला विरोध केला भाजपला विरोध केला नाही

रविंद्र धंगेकर यांनी काय आरोप केले ते मला माहित नाही. एका गुंडाच्या बाबतीत मत व्यक्त केलं आहे. एखादा गुंड असेल त्याची बाजू कुणाला घेता येणार नाही. तुम्ही सत्ताधारी असो का विरोधक असो तो गुंड माझ्या पक्षाशी संबंधित असला तरी त्याचा विरोध केलाच पाहिजे. धंगेकर यांनी गुंडाला विरोध केला भाजपला विरोध केला नाही असे मुनगंटीवार म्हणाले.

दिल्ली भेटीनंतर नवीन जवाबदारी मिळणार का?

दिल्ली भेटीनंतर नवीन जवाबदारी मिळणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांशी सुधीर मुनगंटीवार यांना विचारला, यावेळी ते म्हणाले की,  आता देवेंद्र फडणवीस येणार आहेत. कुठली जबाबदारी देणार आहेत, तुम्ही देवेंद्रजींना विचारुन घ्या. तुमचं समाधान होईल, माझंही समाधान होईल असं मिश्किल उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं.

आणखी वाचा

Comments are closed.