पाकिस्तानात रोजावेळी आत्मघातकी हल्ला; 12 ठार, मृतांमध्ये 4 मुले

पाकिस्तानातील बन्नू येथे दोन स्फोटकांनी भरलेली वाहने लष्करी छावणीच्या भिंतीवर आदळण्यात आली. या आत्मघाती हल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. जिथे आत्मघाती हल्ला झाला तिथेच ही मुले खेळत होती. सूर्यास्त झाल्यानंतर रोजा सोडताना हा हल्ला करण्यात आला.
रमझान महिन्याचे उपवास सुरू झाल्यापासून दहशतवाद्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. लष्कराच्या जवानांनी कमीत कमी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी पाच ते सहा दहशतवाद्यांनी लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला आणि सहा दहशतवाद्यांना ठार केले. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Comments are closed.