Nanded News – किनवट नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा, सुजाता एंड्रलवार विजयी

नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने किनवट नगर परिषदेवर इतिहासात पहिल्यांदा झेंडा फडकावला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदावर सुजाता एंड्रलावर या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत एकूण १३ जागांचे पक्षीय बलाबल असून, भारतीय जनता पक्षाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका या ठिकाणी बसला आहे.

नांदेड जिल्ह्यातील बारा नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले असून, त्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने किनवटला पहिल्यांदा इतिहासात नगराध्यक्षपद प्राप्त झाले आहे. किनवट नगर परिषदेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सुजाता एंड्रलवार विजयी झाल्या आहेत. सुजाता एंड्रलवार यांच्या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच सुजाता एंड्रलवार विजयी झाल्यानंतर त्यांची शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Comments are closed.