लोकसभेनंतर मला अनुभव आलाय, अति घाई संकटात नेई, त्यामुळे निवांत झालोय; सुजय विखेंचं वक्तव्य चर्च
Sujay Vikhe: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल, तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांनी अद्याप अद्यापही अर्ज दाखल केलेले नाहीत. यावरून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
Sujay Vikhe: लोकसभा निवडणुकीनंतर एक अनुभव आलाय
महायुतीच्या उमेदवारांनी अद्यापही अर्ज दाखल केलेले नाही, याबाबत विचारले असता सुजय विखे म्हणाले की, मला लोकसभा निवडणुकीनंतर एक अनुभव आलाय. रस्त्याने येताना एका ट्रकवर लिहिलं होतं की, अति घाई संकटात नेई. त्यामुळे आम्ही निवांत झालो आहोत. आमच्याकडे उमेदवारीसाठी मोठी मागणी आहे. समन्वय साधून योग्य उमेदवार देण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यामुळे उमेदवार घोषित करण्यात विलंब होत आहे.
प्रकाश चित्तेवर सुजय विखे : प्रकाश चित्तेवार सुजय विखेंचा निशाणा
कोपरगाव आणि श्रीरामपूर मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. महायुतीत याबाबत विचारले असता सुजय विखे म्हणाले की, आमचा प्रयत्न महायुतीचा आहे. मात्र महायुतीतील काही पक्षश्रेष्ठींनी चुकीचे निर्णय घेतले. उमेदवारीसाठी एखाद्या पदाची गरिमा न राखणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जात असेल तर आम्हाला ते मान्य नाही. चुकीच्या लोकांना भाजप पाठिंबा देणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपतून शिंदे गटात गेलेले प्रकाश चित्ते यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तर आम्ही शिंदे गटाला नगराध्यक्ष पद देण्यास तयार होतो. पण उमेदवार हा शहरासाठी घातक असेल तर आम्ही युतीत लढणार नाही. जिल्ह्यातील 12 पैकी जवळपास 10 जागांवर महायुती एकत्र लढणार आहे, असे देखील सुजय विखेंनी सांगितले.
Sujay Vikhe on Election: जनता काय करणार हे आज सांगणे कठीण
सुजय विखे पुढे म्हणाले की, आम्हाला मोठा विश्वास आहे. मात्र नगराध्यक्ष जनतेतून होणार आहे. त्यामुळे जनता काय करणार हे आज सांगणे कठीण आहे. कामाच्या आधारावर आपण जनतेत जाणार आहे. केवळ विकास हा निष्कर्ष असला तर महायुतीची सत्ता सगळीकडे येईल. बिहार निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व देशात मान्य होतं आहे. आज ते नेतृत्व आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडे मतदार सकारात्मक पाहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.