30 वर्षांनंतर सुकन्या मोने, डॉ. गिरीश ओक रंगभूमीवर एकत्र!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची आणि भक्कम स्टारकास्टची अधिकृत घोषणा करण्यात आली. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल 30 वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत असून या बहुप्रतीक्षित नाटकाचे नाव ‘आता थांबवायचं कसं?’ असे आहे.

सुकन्या मोने यांच्याशी पुन्हा जुळलेल्या समीकरणाबद्दल डॉ. गिरीश ओक म्हणाले, सुकन्यासोबत तीस वर्षांनंतर नाटकात काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच प्रवासात तिचं आणि संजयचं लग्न आमच्या डोळ्यांदेखत झालं होतं. आज एका नव्या केमिस्ट्रीसह आम्ही एकत्र आलो आहोत. मी पनवेलच्या एका स्पर्धेत ही कथा एकांकिका स्वरूपात पाहिली होती आणि एक मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो होतो. हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर येणं काळाची गरज आहे, असं वाटल्याने मी याचा पाठपुरावा केला असे ते म्हणाले.

Comments are closed.