Summer Tips : उन्हाळ्यात कॉटनचे कपडे धुण्यासाठी सोप्या टिप्स

उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. या वातावरणात आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये तसेच कपड्यांमध्येही बदल करतो. उन्हाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे, बहुतेक लोक असे कपडे घालतात जे त्यांना उष्णतेपासून वाचवतात आणि घाम देखील शोषून घेतात. अशा कपड्यांसाठी सुती कापड अर्थात कॉटनला सर्वाधिक पसंती दिले जाते. कापूस हे एक असे कापड आहे जे उन्हाळ्यात घालण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. त्याचे अनेक प्रकार आहेत. जसे लिनेन कापूस, प्युअर कापूस, मसलिन कापूस आणि मद्रास कापूस. उन्हाळ्यात सुती कपडे घालणे कम्फर्टेबल असते पण जेव्हा असे कपडे धुतले जातात तेव्हा त्यांचा रंग निघून जातो आणि कपडे खूप लवकर जुने दिसू लागतात. अशा परिस्थितीत, सुती कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात सुती कपडे कसे धुवावेत जेणेकरून ते आहे तसेच नवे दिसतील हे आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.

नवीन सुती कपडे खरेदी केल्यानंतर काय करावे?

जेव्हा तुम्ही नवीन सुती कापड खरेदी करता तेव्हा ते परिधान करण्यापूर्वी धुणे खूप महत्वाचे आहे कारण कारखान्यात त्यावर अनेक प्रकारची रसायने लावली जातात जी त्वचेला हानी पोहोचवू शकतात. तसेच, रंगीत कपडे पहिल्यांदा धुण्यापूर्वी, थंड पाण्यात एक चमचा मीठ किंवा अर्धा कप पांढरे व्हिनेगर घाला आणि ते 15-30 मिनिटे भिजवा. या प्रक्रियेमुळे कापडाचा रंग तसाच राहतो आणि धुतल्यानंतर रंग फिकट होण्याची शक्यता कमी होते.

पाण्याचे तापमान योग्य ठेवा

जर तुम्हाला तुमच्या सुती कपड्यांचा रंग फिकट होऊ नये असे वाटत असेल तर नेहमी योग्य तापमानाचे पाणी वापरा. यासाठी फक्त थंड पाणी वापरा. गरम पाण्यामुळे कापसाचे धागे कमकुवत होतात आणि कपडे आकुंचन पावू शकतात व त्यांचा रंगही फिकट पडू शकतो.

योग्य डिटर्जंट वापरा

सुती कपडे खूप नाजूक असतात. हार्ड केमिकल असलेले डिटर्जंट रंग लवकर कपड्यांना फिकट करू शकतात. म्हणून, सौम्य किंवा हर्बल डिटर्जंट वापरावे. जर तुम्ही कपडे हाताने धुत असाल तर प्रथम डिटर्जंट पाण्यात चांगले विरघळवा आणि नंतर त्यात कापड घाला.

कपडे धुण्याची योग्य पद्धत

वेगवेगळ्या रंगांनुसार कपड्यांची क्रमवारी लावा. जसे की गडद आणि हलके रंग एकत्र धुवू नका. कापसाचे कपडे जास्त घासू नका, यामुळे त्यांचे धागे कमकुवत होऊ शकतात. जर डाग असतील तर प्रथम डाग असलेला भाग हलका धुवा, नंतर संपूर्ण कापड धुवा. जर मशीनने धुत असाल तर जेंटल मोड किंवा डेलिकेट सायकल वापरा.

सुकवण्याचा योग्य मार्ग

कपडे थेट उन्हात वाळवू नका. यामुळे रंग फिकट होऊ शकतो. कपडे उलटे करा (आतून बाहेर) आणि सावलीत वाळवा. शक्य असल्यास, कपडे उन्हात वाळवण्याऐवजी, ते सावलीच्या ठिकाणी वाळवा. जेणेकरून त्यांचा आकार आणि रंग यावर फार परिणाम होणार नाही.

हेही वाचा : सोया नग्जेट्स: इन्स्टंट होनारा ब्रेकफास्ट सोया नागेट्स


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.