पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतल्याने सनरायझर्सविरोधात संताप; आता काव्य मारनच्या वडिलांचा CSK
आयपीएल 2026 हंगाम सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. यावेळी या वादाचं कारण सनरायझर्स फ्रँचायझी आहे. काव्या मारनच्या मालकीची ही फ्रँचायझी दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. त्यापैकी एक म्हणजे इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूला खरेदी केले. ऑक्शनमध्ये सनरायझर्स लीड्स या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला विकत घेतले, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याचवेळी काव्या मारनच्या वडिलांच्या कंपनी सन टीव्ही नेटवर्कने आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला आहे.
सन टीव्हीने CSK विरोधात केस का केली? (Sun TV Network case files against CSK)
आयपीएलसह जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये संघ मालकी असलेल्या सन टीव्ही नेटवर्कने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात नागरी दावा दाखल केला आहे. हा वाद सीएसकेच्या काही प्रमोशनल व्हिडिओमुळे निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये रजनीकांतच्या प्रसिद्ध चित्रपटातील जेलर, जेलर-2 आणि कूली या चित्रपटातील गाण्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. साधारणपणे सीएसके आपल्या खेळाडूंच्या प्रमोशनसाठी तमिळ चित्रपटांतील संगीताचा वापर करते. मात्र या वेळी वापरलेले संगीत आणि चित्रपटांचे हक्क सन टीव्ही नेटवर्कचीच कंपनी सन पिक्चर्सकडे असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे सन टीव्ही नेटवर्कचा आरोप आहे की, चेन्नई सुपर किंग्सने परवानगी न घेता या गाण्यांचा वापर करून कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच फ्रँचायझीविरुद्ध न्यायालयात केस दाखल करण्यात आली असून अशा प्रकारचा वापर तात्काळ थांबवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी, 13 मार्च रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अबरार अहमदला खरेदी केलीनेही वाड (काव्या मारन अबरार अहमद द हंड्रेड लीग)
दरम्यान, आता सन टीव्ही नेटवर्कची फ्रँचायझी सनरायझर्स लंडन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ‘द हंड्रेड’ लीगच्या ऑक्शनमध्ये या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला 1,90,000 पाउंड (सुमारे 2.3 कोटी रुपये) मोजून आपल्या ताफ्यात घेतले. यामुळे अबरार अहमद हा ‘द हंड्रेड’मध्ये भारतीय मालकीच्या फ्रँचायझीकडून खरेदी करण्यात आलेला पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. या निर्णयावर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी फ्रँचायझीवर टीका करत आयपीएलमध्ये या संघाचा बहिष्कार घालण्याचीही घोषणा केली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.