‘काल मला सुनेत्रा वाहिनींचा फोन आला…’, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला जाणार की न
Baramati byelection: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती (Baramati bypoll 2026) पिंजून काढल्यानंतर मंगळवारी याठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हेही उपस्थित राहणार आहेत. या सांगता सभेबाबत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वहिनींचा फोन आला होता, आम्ही आधीच निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेतली होती, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
Supriya Sule : मला काल आमंत्रणाचा फोन आला की नक्की या…
मला काल सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता की, कुटूंब म्हणून प्रचाराला या. कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि आम्ही सर्वांनी पहिल्यांदाच निर्णय घेतला होता. सुनेत्रा वहिनींची निवड बिनविरोध व्हावी. ही पहिली भूमिका आम्ही मांडली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष, उद्धव ठाकरेंचेही मी आभार मानते. त्या सर्वांनीच सहकार्याची भूमिका घेतली आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने कारण का मला काल आमंत्रणाचा फोन आला की नक्की या. तर कुटूंब म्हणून मी अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. आमचे मित्रपक्ष आहेत, त्यामुळे काही नैतिक जबाबदारी म्हणून मी काल काँग्रेसशी बोलले आणि उद्धव ठाकरेंशीही बोलले, दोघांचीही सहकार्याची भावना इतकीच होती की, कुटूंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा, आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला, महाविकास आघाडीतील पक्षांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिला आहे. आम्हाला सर्वांना वाटलं होतं की, निवडणूक बिनविरोध होईल, मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Supriya Sule : शरद पवार सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला येणार का?
शरद पवार सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला येणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आत्ता आहेत, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतर काय ते समजेल, असंही सुळेंनी पुढे म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे : ३ ते ४ वाजता आम्ही बारामतीच्या सभेला असू
माझा भाऊ गेला आहे, पोटनिवडणूक होईल असे वाटत नाही, आज ही अंगावर काटा येतो,अनेक वेळा असे वाटते की दादा गेला का? खरंच दादा गेला की नाही अशी भावना निर्माण होते. विमान पडले कसे? दादा खरंच गेले? असे प्रश्न मनात निर्माण होते आहेत, आमच्या नात्यात कधीही अंतर आलेले नाही, काल, आज आणि उद्या, वैयक्तिक संबंध राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. मला आज दुःख होते आहे, मी जड अंतःकरणाने मी बारामतीला जाते आहे, माझा भाऊ गेला आहे. मला खेड शिवापुरला सायंकाळी लग्नाला जायचंं आहे, ३ ते ४ वाजता आम्ही बारामतीच्या सभेला असू, सीएम कधी येणार माहिती नाही, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Baramati Election: अजित पवारांच्या निकटवर्तीयांना आजच्या सभेला विशेष आमंत्रित केले
अजित पवारांच्या निकटवर्तीयांना आजच्या सभेला विशेष आमंत्रित केले आहे. जवळपास 200 जणांना सांगता सभेला आमंत्रित केलं आहे. ज्यांनी अजित पवारांना सुरुवातीपासून साथ दिली अशा लोकांना सांगता सभेला आमंत्रित केलं आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आज सांगता सभेच्या मंचावर असणार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.