अजित पवार गटात सर्व काही आलबेल नाही… सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र; अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली?
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा आरोप करत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. या आरोपांना सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पक्षावर पकड कुणाची यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता अजित पवार गटाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवार यांचा मोठा आरोप
Comments are closed.