मुलीला ताप आला होता! ती रात्र मी अजिबात विसरू शकणार नाही, असे का म्हणाला सुनील शेट्टी

‘बाॅर्डर’ हा चित्रपट आठवल्यावर त्यातील अनेक कलाकार आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे सुनील शेट्टी. 1997 साली प्रदर्शित झालेला बॉर्डर सिनेमा, आजही प्रेक्षकांना आवडतो. मुख्य म्हणजे या सिनेमातील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटात अनेक हिट गाणी आहेत मात्र त्यातील एक ‘तो चलू’ हे गाणं सध्या चर्चेत आहे कारण सुनिल शेट्टी यांनी या गाण्यामागची एक इनसाइट स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिनेते सुनिल शेट्टी यांनी पिंक व्हिलाला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला. सिनेमातील गाण्याच्या शूटिंगसाठी सुनिल शेट्टीने त्यांच्या बायकोला आणि मुलीला सोडून सिनेमाला प्राधान्य दिलं होतं. सुरुवातीला सुहागरात सॉंग ‘तो चलूँ’ या गाण्याच्या शूटींगदरम्यान मी थोडा बैचेन झालो होतो, असं सुनिल शेट्टी यांनी सांगितलं. पण त्यानंतर मी सिनेमाचे डायरेक्टर जेपी दत्ता यांच्याशी बोललो आणि माझं मन शांत झालं, असे ते यावेळी म्हणाले.
सुनिल शेट्टी यांनी पुढे सांगितलं की, या गाण्याचं शूटींग आयुष्यभर माझ्या लक्षात राहिलं. यावेळी माझी मुलगी अथिया फक्त 3 वर्षांची होती. हे गाणं ज्या दिवशी शूट झालं त्या रात्री माझी मुलगी खूप आजारी होती. त्यावेळी ती तापाने फणफणत होती. आणि तेव्हा दिल्लीत वादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मला तिला दिल्लीहून मुंबईला पाठवावे लागले होते. त्यामुळे हे शूटींग माझ्या चांगलच लक्षात राहिलंय, असे सुनिल शेट्टी म्हणाले.
Comments are closed.