सुनील छेत्री पुन्हा येतोय, फुटबॉल निवृत्तीतून माघारीचा निर्णय

हिंदुस्थानी फुटबॉलचा स्टार सुनील छेत्री पुन्हा येतोय. हे ऐकून हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केले होते, मात्र आता त्याने हिंदुस्थानी फुटबॉल संघाला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळवून देण्याच्या ध्येयाने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. तो 19 मार्चला मालदीवमध्ये होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात खेळताना दिसेल.
एएफसी आशिया चषक 2027 च्या पात्रता फेरीचा सराव म्हणून मालदीवविरुद्ध हा सामना खेळला जाणार असून त्यानंतर 25 मार्चला बांगलादेशमध्येही एक सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांत छेत्री खेळणार असून यासाठी त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या पात्रता फेरीच्या गटात हिंदुस्थानसह बांगलादेश, हाँगकाँग आणि सिंगापूर या संघांचा समावेश आहे. शिलाँगच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हे सामने खेळविले जाणार आहेत.
Comments are closed.