सुनील गावसकरांच्या पुढाकाराने गोल्फ
हिंदुस्थानी क्रिकेटचे दिग्गज सुनील गावसकर यांनी क्रीडा क्षेत्रातील माजी खेळाडूंसाठी पुढाकार घेत डीपी वर्ल्ड सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेची घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारी 6 मार्चला चेंबूरमधील येथे मुंबई प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबवर हा अनोखा धर्मादाय उपक्रम रंगणार आहे.
गावस्कर यांच्या ‘चॅम्प्स फाउंडेशन’साठी जागरूकता आणि निधी उभारणी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक व वैद्यकीय अडचणीत सापडलेल्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मदतीचा हात देणाऱया या संस्थेने अनेक क्रीडा नायकांना आधार दिला आहे.
या विशेष गोल्फ इव्हेंटमध्ये युवराज सिंग, हरभजन सिंग, वेंकटेश प्रसाद, अजय जाडेजा, इयॉन मॉर्गन, मायकल वॉन आणि टेनिस दिग्गज लिअॅण्डर पेससारखे हिंदुस्थानी व जागतिक खेळाडू सहभागी होणार आहेत. हा केवळ गोल्फ नाही, तर क्रीडा परिवाराला परतफेड करण्याचा प्रयत्न असल्याची भावना सुनील गावसकर यांनी बोलून दाखवली.
Comments are closed.