गावस्करांनी निवडली भारताची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, कपिल देव नाही, तर 'या' खेळाडूला बनवले कर्णधार..!

नुकतीच आयसीसी चॅम्पयन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) स्पर्धा खेळली गेली. त्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. दरम्यान भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी भारताची ऑल टाईम वनडे प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्यांनी त्यांच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंना समाविष्ट केले आहे. पण गावस्करांनी त्यांच्या संघात माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची सलामीवीर म्हणून निवड केलेली नाही. याशिवाय, त्यांनी कपिल देव यांना या संघाचा कर्णधार देखील बनवले नाही. (Sunil Gavaskar has selected the Indian team’s all-time playing XI)

सुनील गावस्कर यांनी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे. रोहित शर्माने 3 वेळा द्विशतक झळकावले आहे. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी 1983च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य मोहिंदर अमरनाथची निवड केली आहे. गावस्करांनी त्यांच्या संघात पाचव्या क्रमांकावर युवराज सिंगची निवड केली आहे.

युवराज सिंगने 2011चा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युवराजला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याने फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून भारतासाठी उत्कृष्ट योगदान दिले होते. यानंतर, गावस्करांनी माजी दिग्गज भारतीय कर्णधार एमएस धोनीची त्यांच्या संघात कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग यांना 2 फिरकीपटू म्हणून निवडले आहे. यानंतर, त्यांनी त्यांच्या संघात मोहम्मद शमी आणि झहीर खान हे 2 वेगवान गोलंदाज म्हणून निवडले आहेत.

सुनील गावस्करांची ऑल टाईन प्लेइंग 11- सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, मोहिंदर अमरनाथ, युवराज सिंग, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कपिल देव, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, मोहम्मद शमी आणि झहीर खान

Comments are closed.