हर्षित राणावर टीका करणाऱ्या माजी क्रिकेटपटूवर सुनील गावस्करांचा संताप! जाणून घ्या काय म्हणाले?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हर्षित राणाची (Harshit Rana) टीम इंडियामध्ये ODI मालिकेसाठी निवड झाल्यानंतर त्याच्या निवडीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत (Krushnamachari Shrikant) यांनी दावा केला होता की, हर्षित राणा गौतम गंभीर यांच्या जवळचा त्याला असल्यामुळेच संघात स्थान मिळाले.
मात्र, हर्षितने मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात 4 विकेट घेत सर्व टीकाकारांना उत्तर दिले आणि आता हर्षित राणावरील या चर्चेत सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) देखील सहभागी झाले आहेत.
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, सुनील गावस्कर यांनी हर्षित राणाची स्तुती करताना म्हटले, हर्षित राणाने 4 विकेट घेतल्या, त्याच्या कामगिरीबद्दल मला खूप आनंद झाला. त्याच्यावर अनावश्यक टीका करण्यात आली होती. अशा प्रकारची कठोर टीका समजण्याच्या पलिकडची आहे, कारण शेवटी ही आपलीच टीम आहे. सामना किंवा मालिका सुरू होण्यापूर्वी खेळाडूवर टीका करणे म्हणजे त्याचे मनोबल कमी करणे होय.
गावस्कर पुढे म्हणाले की, मालिका संपल्यानंतर तुम्ही निवडीबाबत प्रश्न विचारू शकता, पण त्याआधी नव्हे. त्यांच्या मते, टीम एकदा जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाने त्या संघाला पूर्णपणे साथ द्यावी आणि त्याच्या विजयाची कामना करावी.
त्यांनी स्पष्ट सांगितले, शेवटी ही आपली टीम आहे, संपूर्ण भारताची टीम.
भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी, माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी म्हटले होते, टीममध्ये फक्त एकच स्थिर सदस्य आहे हर्षित राणा. कोणालाच ठाऊक नाही की, तो संघात का आहे. सतत बदल केल्याने इतर खेळाडूंचे मनोबल खच्ची होईल. जे चांगले खेळत आहेत त्यांना संधी न देता, काही खेळाडूंना पुन्हा पुन्हा घेतले जाते. हर्षित राणा हे त्याचे उदाहरण आहे, जे गौतम गंभीरची खुशामत करतात.
Comments are closed.