रोहित शर्माच्या भविष्याबाबत गावस्करांचं आश्चर्यकारक विधान, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

भारतीय वनडे टीमचा कर्णधार बदलला गेल्यामुळे ‘रोहित शर्मा (Rohit Sharma) युग’ संपले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी सांगितले की, शुबमन गिलला (Shubman gill) वनडे संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे, तर रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून खेळत राहील. या दरम्यान, भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणतात की लवकरच रोहितसंबंधी आणखी ‘वाईट बातमी’ येऊ शकते.

गावस्करांच्या मते, 2027 च्या ODI विश्वचषकापर्यंत भारतीय संघाने फारसे वनडे सामने खेळायचे नाहीत. त्यामुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहलींना आपली गेम फिटनेस टिकवायची असेल, तर त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय राहावे लागेल.

पुढे बोलताना गावस्कर यांनी सांगितले, होय, नक्कीच. जर रोहित शर्मा पूर्णपणे तयार राहणार नसेल, किंवा पुढील दोन वर्षे खेळायला तयार आहे की नाही हे ठरवू शकत नसेल, तर त्याला वाईट बातमीसाठी तयार रहावे लागेल. त्याला माहित आहे की, जर फक्त ODI खेळले, तर जास्त सरावाची गरज भासेल आणि विजय हजारे ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागेल.

भारतीय दिग्गजाने असेही सांगितले की, रोहित आता फक्त वनडे खेळत आहे, पण 2027 विश्वचषकापर्यंत संघाला जास्त ODI सामने खेळायचे नाहीत. त्यामुळे रोहितला त्यासाठी आवश्यक सराव पुरेसा मिळणार नाही. गावस्कर म्हणाले की, रोहितची संघातील जागा निश्चित नसल्यामुळेच कदाचित शुबमन गिल यांना कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments are closed.