IPL 2026 खेळाडूंच्या अचानक माघारीवर सुनील गावस्कर संतापले; BCCI कडे केली ‘ही’ मोठी मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आयपीएलच्या (IPL) लिलावात निवड झाल्यानंतर अचानक माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कडक ताशेरे ओढले आहेत. अशा खेळाडूंना लगाम घालण्यासाठी बीसीसीआयने सध्याच्या शिक्षा प्रणालीचा गांभीर्याने फेरविचार करावा, अशी मागणी गावस्कर यांनी केली आहे. या खेळाडूंवर फक्त दोन वर्षांची बंदी आणणे ही शिक्षा देखील कमीच असल्याचे मत गावस्कर यांनी मांडले आहे.

गेल्या काही काळापासून अनेक परदेशी खेळाडू आयपीएल लिलावात मोठी बोली लागल्यानंतरही ऐनवेळी ‘कामाचा ताण’ (Workload Management) किंवा ‘वैयक्तिक कारणे’ सांगून स्पर्धेतून माघार घेतात. सध्याच्या नियमांनुसार, अशा खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. मात्र, ही शिक्षा खेळाडूंना रोखण्यासाठी पुरेशी नाही, असे गावस्कर यांचे मत आहे.

“हे प्रकरण खरोखर कठीण आहे. खेळाडू लिलावात विकले जातात आणि नंतर माघार घेतात. त्यामुळे सध्याची दोन वर्षांची बंदी प्रभावी ठरत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बीसीसीआयने अशा काही शिक्षेचा विचार केला पाहिजे ज्याचा खेळाडूंवर मोठा परिणाम होईल. जोपर्यंत खेळाडूच्या भविष्यातील संधींवर आणि त्याच्या कमगिरीवर याचा परिणाम होत नाही, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत.”

गावस्कर यांनी यावेळी इंग्लंडच्या बेन डकेटचे उदाहरण दिले. “बेन डकेटने ॲशेस मालिकेत चांगली कामगिरी केली होती. जर त्याला ‘द हंड्रेड’ लिलावात चांगली किंमत मिळाली असेल, तर कदाचित तो इथे खेळण्यापेक्षा आपल्या कसोटी कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणे पसंत करेल. पण अशा निर्णयामुळे आयपीएल फ्रँचायझींचे नियोजन कोलमडते, हेही लक्षात घ्यायला हवे,” असेही त्यांनी नमूद केले.

Comments are closed.