'भारतीय क्रिकेटमुळेच तुमचा पगार…', गावस्करांनी माजी इंग्लिश कर्णधाराला झापलं!
Sunil Gavaskar Reply To Nasser Hussain: यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून (Champions Trophy 2025 ) पाकिस्तानचा प्रवास केवळ पाच दिवसांत संपला. स्पर्धेत पाकिस्तानला न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तर पाकिस्तान-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक आकिब जावेद यांनी एक विचित्र विधान केले होते. आकिब जावेद म्हणाले होते की भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा मिळत आहे. आता, इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांनी आकिब जावेदच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे.
आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुनील गावस्कर म्हणाले की, या लोकांनी रडण्याऐवजी त्यांच्या संघाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे. हे लोक बुद्धिमान आणि अनुभवी लोक आहेत. तुम्ही तुमच्या संघाच्या कामगिरीवर लक्ष का केंद्रित करत नाही? तुमचा संघ पात्रता का मिळवू शकला नाही याचा तुम्ही तपास केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे मोठे योगदान आहे. तुमचा पगार भारताच्या महसुलावर अवलंबून असतो. भारत जागतिक क्रिकेटसाठी मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण करतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे आयोजन पाकिस्तान करत आहे. जवळजवळ 29 वर्षांनंतर, पाकिस्तानला कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला नाही. त्यानंतर भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत दुबईमध्ये आपले सामने खेळत आहे. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांग्लादेश आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारताचा शेवटचा लीग स्टेज सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ उद्या 2 मार्च रोजी एकमेकांसमोर येतील. विशेष सांगायचे झाले तर भारतीय संघ आधीच गट ‘अ’ मधून चॅम्पियन्स ट्राॅफीच्या उपांत्यफेरीसाठी पात्र झाला आहे. दुसरीकडे किवी संघाने देखील पात्रता मिळवली आहे.
हेही वाचा-
Champions Trophy 2025: रोहित शर्माचा पत्ता कट? शुबमन गील टीम इंडियाचा कर्णधार!
किंग कोहली पुन्हा इतिहास रचणार? न्यूझीलंडविरुद्ध मोडू शकतो हे 3 महान विक्रम!
ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित!
Comments are closed.