IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध सुनील नरेनने रचला इतिहास; कायरन पोलार्डचा मोठा विक्रम उध्वस्त

आयपीएल 2026 स्पर्धेचा (Indian premiere league 2026) दुसरा सामना 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होताच सुनील नरेनने (Sunil Naren) इतिहास रचला आहे. त्याने कायरन पोलार्डला मागे टाकले असून, सुनील नरेन आता आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू बनला आहे.

यापूर्वी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू कायरन पोलार्डच्या नावावर होता. मात्र, आता सुनील नरेनने त्याला मागे टाकले आहे. सुनील नरेन आता 190 सामन्यांसह सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे, ज्याने 189 सामने खेळले आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स (184 सामने) आणि चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर (184 सामने) आहेत. तर ड्वेन ब्राव्हो 161 सामन्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक सामने खेळणारे परदेशी खेळाडू
190 : सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स)
१८९: किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)
184 : एबी डिव्हिलियर्स (दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)
184 : डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद)
161: ड्वेन ब्राव्हो (मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, चेन्नई सुपर किंग्स)

37 वर्षीय सुनील नरेनने वेस्ट इंडिजसाठी 6 कसोटी सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत, तर 65 वनडे सामन्यात त्याने 92 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच 51 टी-20 सामन्यात त्याने 52 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्येही सुनीलने चमकदार कामगिरी केली असून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याने 190 सामन्यात 192 विकेट्स घेतल्या आहेत, तर फलंदाजीमध्ये 1780 धावा केल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे नरेनने आयपीएलमध्ये केवळ केकेआरसाठीच (KKR) खेळले आहे, कोलकाताने त्याला कधीही रिलीज केले नाही.

Comments are closed.