कपिल शर्माच्या शोमध्ये अपमान झाल्याप्रकरणी सुनिल पाल नाराज, नेमकं काय घडलं?
सुनिल पाल यांनी द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये झालेल्या अनुभवाबद्दल पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. शोमध्ये आपला अपमान झाल्याची भावना असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सुनील पाल यांनी सांगितले की, त्यांना शोमध्ये स्टँड-अप कॉमेडी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष शूटिंगदरम्यान परिस्थिती वेगळीच निघाली. त्यांनी आरोप केला की, शोच्या निर्मात्यांनी मुद्दाम त्यांना लक्ष्य केले आणि संपूर्ण वातावरण त्यांच्या विरोधात तयार करण्यात आले.
शोमध्ये समय रैना यांनी सुनील पाल यांच्यावर विनोद करताना “ते दात घासत नाहीत” असा टूथब्रश संदर्भातील जोक केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुनील पाल म्हणाले की, त्या क्षणी त्यांना अपमानित वाटले. “मी आधी अनेकदा कपिल शर्माच्या शोमध्ये गेलो होतो आणि प्रत्येक वेळी स्टँड-अप केला होता. पण यावेळी मला वेगळ्याच प्रकारे खेचण्यात आले,” असे त्यांनी म्हटले. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
तसेच, कॉमेडी शोमध्ये थोडीफार चेष्टा-मस्करी चालते. पण माझ्यासोबत जे झाले ते जरा जास्तच झाले. त्यामुळे माझ्या चाहत्यांनाही वाईट वाटले, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सूत्रसंचालकाने समय रैनाने शोमध्ये त्यांचा आदरही केला होता, असे सांगितल्यावर सुनील पाल यांनी उत्तर दिले की, शोमध्ये सगळे मजा करत होते, मात्र काही गोष्टी मर्यादेपलीकडे गेल्या. सुनिल पाल नाराज असलेल्या या वादामुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली असून, चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Comments are closed.