सरकारच्या अटींमुळे 25 ते 30 लाख शेतकरी कर्जमाफीला मुकणार, सुनील प्रभू यांचा घणाघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला. ”सरकारच्या पात्र अपात्र अटींमुळे 25 ते 30 लाख शेतकरी कर्जमाफीला मुकणार” असा घणाघात सुनील प्रभू यांनी केला आहे.

”हवेवरचे किल्ले बांधून जमिनीचा का सोस धरावा, स्वप्ने विकण्याच्या बाजारात वास्तवाचा का शोध घ्यावा अशी परिस्थिती सध्या आहे. हे सरकार स्वप्न विकण्यात तरबेज आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर जे संकट ओढवलंय ते इतकं भयावह आहे. की भविष्यात राज्य दिवाळखोरीत जाईल का अशी भिती वाटतेय, असे सुनील प्रभू म्हणाले.

”मजूर घामाने भिजलाय, शेतकरी कर्जात बुडालाय तरीही सांगा साहेब तुमचा विकसित महाराष्ट्र नक्की कुठे दडलाय, हा प्रश्न मनात आहे. कामगार आणि श्रमिक वर्गाची चाललेली थट्टा थांबवल्यास आपण एक ट्रिलियन डॉलर पर्यंत आपण पोहचू शकतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आवश्यक आहे मात्र ३० ते ३५ लाख शेतकरी पात्रतेच्या अटीमुळे कर्जमाफीस मुकणार आहेत”, अशा शब्दात त्यांनी सरकारला फटकारले.

कुठे आहेत अर्थमंत्री?

जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पावर चर्चा होते तेव्हा तेव्हा अर्थमंत्री सभागृहात हजर असतात. अजित पवार कायम समोरच्या बाकावर बसून अर्थसंकल्पावरील चर्चा ऐकायचे, जो पर्यंत अर्थमंत्री येत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, असे सुनील प्रभू यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर अर्थराज्यमंत्र्यांना बोलावण्यात आले.

सरकारची प्रगती कर्जाच्या पैशावर

राज्यावर 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न दाखवतंय. पण राज्यावर तब्बल 11 लाख कोटी कर्ज आहे. व्याजापोटी 70 हजार कोटी आपल्याला मोजावे लागतायत. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसावर 85278 रुपयाचं कर्ज आहे.

Comments are closed.