मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी फिरवला; म्हणूनच दम भरलेल्या शरद पवारांसोबत जाण्याच


सुनील शेळके भाजपवर लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत (Lonavala Municipal Council Elections) मोठा राजकीय कलाटणीकारक बदल समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप करत दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रित लढतीची घोषणा केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी (Bala Bhegde) फिरवला. म्हणूनच दम भरलेल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची वेळ आली,” असे सुनील शेळकेंनी स्पष्ट केले आहे.

तळेगाव आणि लोणावळ्यातील सत्तावाटणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही, असा थेट आरोप सुनील शेळकेंनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पहिले अडीच वर्ष तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष, तर लोणावळ्यात अजित पवार गटाचा नगराध्यक्ष, असा जाहीर तोडगा ठरला होता, परंतु बाळा भेगडे यांनी हा शब्द मागे घेतला. या पार्श्वभूमीवर सुनील शेळकेंनी शरद पवार गटाशी हातमिळवणी करत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणण्याचा निर्णय अधिकृत केला.

Sunil Shelke on BJP: भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी

लोकसभेवेळी शरद पवारांनी सुनील शेळकेंना सज्जड दम भरला होता. त्यावेळी शरद पवार म्हणतात मला, हे लक्षात ठेवा. असा इशारा दिल्यानंतर शेळके ही संतापले होते. मात्र आज हे सगळं विसरुन भाजपला धडा शिकवण्यासाठी शेळकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आहे. पहिले अडीच वर्षे तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष अन लोणावळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष, असा मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही. असा आरोप शेळकेंनी केला आणि यानिमित्ताने पवार काका-पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याबाबत त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

Sunil Shelke on BJP: सुनील शेळके राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार

दरम्यान, आमदार सुनील शेळके हे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आहे. या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून यामुळे नगरपरिषद निवडणूक भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे. लोणावळ्यातील ही नव्याने उभी झालेली राजकीय मैत्री ही निवडणुकीसाठी ‘गेंम-चेंजर’ ठरू शकते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Municipal Corporation Election 2025 BJP Survey: मुंबई मनपाबाबत भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, 100 जागा मिळण्याचा अंदाज; पण स्वबळासाठी कसरत करावी लागणार!

आणखी वाचा

Comments are closed.