कोकण पर्यटनासाठी जाहीर योजनांची अंमलबजावणी नाही! सुनील शिंदे यांनी वेधले लक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक स्तरावर कोकणचा किनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. मागील अनेक वर्षांत कोकणच्या पर्यटनासाठी शासनाने विविध पॅकेजेस व योजना जाहीर केल्या, परंतु या योजनांची अंमलबजावणी किंवा दिलेल्या पॅकेजेसनुसार कोकणचा विकास झालेला दिसून येत नसल्याकडे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले.

260 अन्वये चर्चेत सहभागी होत सुनील शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. शहरी भागात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाच्या जेवढय़ा संधी उपलब्ध आहेत, तेवढय़ाच संधी ग्रामीण भागातसुद्धा आहेत. पर्यटनाच्याबाबत ग्रामीण भागात शासन यंत्रणा अजूनही पोहचली नसून, ग्रामीण भागातील पर्यटन विकासासाठी निधीचाही अभाव दिसत असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.