हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय, 18 वर्षात पहिल्यांदाच भेदला चेपॉकचा अभेद्य गड

सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह हैदराबादने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, तर दुसरीकडे चेन्नईसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. हैदराबादने हा सामना 8 चेंडू शिल्लक असताना जिंकला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एसआरएचने चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे.
हैदराबादला 155 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. खलील अहमदने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला (0) बाद केले. तर ट्रॅव्हिस हेड 16 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हेन्रिक क्लासेनही 7 धावांवर माघारी परतला. ज्यामुळे हैदराबादने 54 धावांवर 3 मोठे बळी गमावले. ईशान किशन (44) आणि अनिकेत वर्मा (19) यांनी 36 धावांची भागीदारी केली. नंतर कमिंदू मेंडिस (32*, 22 चेंडू) आणि नितीश कुमार रेड्डी (नाबाद) यांनी 49 धावांची नाबाद भागीदारी करत हैदराबादला विजय मिळवून दिला.
Comments are closed.