7 सामने गमावले तरीही हैदराबादला प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद संघाकडून या हंगामात ज्या प्रकारच्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना होती, संघाने त्या प्रकारचे प्रदर्शन केले नाही. संघाला शुक्रवार 2 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. संघाचा हंगामातील हा सातवा पराभव होता. संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये फक्त तीन सामने जिंकले आहेत.
हैदराबाद सध्या पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. तरीसुद्धा संघ स्पर्धेतून बाहेर पडला नाही. त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
जर संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना सर्व 4 सामने जिंकावे लागतील. तसेच संघाला त्यासोबत त्यांच्या नेट रन रेट वर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. जर संघ असे करण्यात यशस्वी झाला, तर त्यांचे 14 पॉईंट्स होतील. त्यानंतरही त्यांना दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागू शकते.
हैदराबाद संघाचे दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, लखनऊ यांच्यासोबत अजून सामने बाकी आहेत. त्यामध्ये ते कसं प्रदर्शन करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्यांच्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
Comments are closed.