हैदराबादने केली कोलकात्याची शिकार! हेड अन् क्लासेनमुळे काव्या मारनच्या टीमचा शेवट ‘गोड’
सनराइसेस हैदराबाद वि कोलकाता नाइट रायडर्स: सनरायझर्स हैदराबादने अखेर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेतला. आयपीएल 2025 चा हंगाम या दोन्ही संघांसाठी खूप खराब राहिला, आयपीएलच्या गेल्या हंगामातील विजेते आणि उपविजेते होते आणि ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. पण हंगामातील शेवटच्या सामन्यात सनरायझर्सने आपली पूर्ण ताकद दाखवत, गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याचा 110 धावांनी पराभव केला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. अभिषेक 16 चेंडूत 32 धावा काढून आऊट झाला. पण, त्याच्या बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन केकेआर संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हेडने 40 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या.
𝙃𝙚𝙖𝙙𝙞𝙣𝙜 च्या दिशेने 𝙆𝙡𝙖𝙨𝙨𝙮 शो 🍿#एसआरएच या क्षणी समुद्रपर्यटन ⛵
अद्यतने ▶ https://t.co/4veibn1bos #Takelop | #Srhvkkr | @सुनरायझर्स pic.twitter.com/amktayk7ps
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 25 मे, 2025
हेडची विकेट पडल्यानंतर, क्लासेनने बदलले गीअर्स
हेडची विकेट पडल्यानंतर क्लासेनने आपले गीअर्स बदलले. त्याने 27 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह, क्लासेन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला. हा उजव्या हाताचा फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिला. क्लासेनने 109 धावांच्या खेळीत एकूण 7 चौकार आणि 9 षटकार मारले. तर, इशान किशनने 29 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे, संपूर्ण षटक खेळल्यानंतर हैदराबादने फक्त 3 विकेट गमावून 278 धावा केल्या, जो आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीतील पहिले तीन मोठे धावसंख्याही एसआरएच संघानेच केली आहे. केकेआरकडून सुनील नरेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 42 धावा देत 2 विकेट घेतल्या.
जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा आकाश मर्यादा नाही! 🫡
Mind 𝙃𝙚𝙞𝙣𝙧𝙞𝙘𝙝 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 𝙨𝙝𝙤𝙬 🚀 🚀
स्कोअरकार्ड ▶ https://t.co/4veibn1bos #Takelop | #Srhvkkr | @सुनरायझर्स pic.twitter.com/waosr90wrg
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 25 मे, 2025
रहाणे- रिंकु-रसेलसह सगळे ठरले फेल
279 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. सुनील नरेनने निश्चितच काही चांगले फटके खेळले, पण चौथ्या षटकात त्याची विकेट पडली. यानंतर, रहाणेही सहाव्या षटकात आऊट झाला. रहाणेच्या बॅटमधून फक्त 15 धावा आल्या. यानंतर, जणू काही विकेट पडण्याची एकच झुंबड उडाली असे वाटत होते. डी कॉक सातव्या षटकात आणि रिंकू सिंग आठव्या षटकात आऊट झाला. रिंकूने 9 धावा केल्या. आठव्या षटकात रसेलही खाते न उघडता बाद झाला.
यानंतर मनीष पांडेने काही चांगले शॉट खेळले, पण तोही 37 धावा करून आऊट झाला. कोलकाताचा डाव 19 व्या षटकात संपला आणि हैदराबादने 110 धावांनी सामना जिंकला.
🔙 ते 🔙 विकेट ☝
कठोर दुबे त्याच्या उपस्थितीला वाटले 🧡
अद्यतने ▶ https://t.co/4veibn1bos #Takelop | #Srhvkkr pic.twitter.com/U4SFM0 मिमी 54
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 25 मे, 2025
अधिक पाहा..
Comments are closed.