आशिया कप सुपर-4 फॉरमॅटचं समीकरण नेमकं कसं? जाणून घ्या भारताला फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागणार?

आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) फायनल सामना रविवार, 28 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये कोणत्या संघांना स्थान मिळाले ते ठरले आहे. भारत हा सुपर-4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्याचप्रमाणे पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेलाही सुपर-4 मध्ये जागा मिळाली आहे. पण टीम इंडियाला या स्पर्धेतील फायनलमध्ये पोहोचायचं आहे. भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी सर्व संघांना एक एक करून पराभूत करावं लागेल. भारतासाठी सर्वात मोठं आव्हान श्रीलंकेकडून येऊ शकत, कारण ते ग्रुप बी मध्ये सर्व सामने जिंकलेला संघ आहे.

आशिया कपच्या सुपर-4 मध्ये पोहोचलेले चारही संघ एकमेकांविरुद्ध सामना करतील. शेवटी ज्यांच्याकडे सर्वाधिक पॉइंट्स असतील, ते दोन संघ फायनलमध्ये प्रवेश करतील. भारताला सुपर-4 मध्ये तीन सामने खेळावे लागतील. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध असेल, दुसरा सामना बांग्लादेशविरुद्ध आणि शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध होईल. भारताचे सर्व सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जातील आणि भारताच्या वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.

भारताचा सुपर-4 मधला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रविवार, 21 सप्टेंबर रोजी असेल. टीम इंडिया बांग्लादेशविरुद्ध सामना बुधवार, 24 सप्टेंबरला खेळेल.
भारताचा सुपर-4 मधला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध शुक्रवार, 26 सप्टेंबरला होईल.

भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तीन पैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला प्रथम पाकिस्तानला पराभूत करावे लागेल, त्यानंतर बांग्लादेशलाही हरवावे लागेल. जर टीम इंडिया श्रीलंकेला पण हरवू शकल्यास, तर ती टेबल टॉपर बनून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.
जर भारताला तीन पैकी दोन सामने जिंकता आले, तर ते दोन्ही सामने मोठ्या अंतराने जिंकली पाहिजेत, जेणेकरून नेट रन रेटमुळे टीम इंडिया फायनलसाठी बाहेर पडणार नाही.

Comments are closed.