शेष मुंबई शालेय संघाने मारली बाजी
मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि जेबीसीएन यांच्या पुढाकाराने आयोजित सुपर कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गाइल्स शिल्ड विजेत्या ज्ञानदीप संघाला शेष मुंबई शालेय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव सहन करावा लागला. ज्ञानदीप सेवा मंडळाने नील नाईकच्या 65 धावांमुळे सर्वबाद 177 धावा केल्या होत्या तर शेष मुंबई शालेय संघाने हे लक्ष्य अक्षत जोशी (72) आणि सुजल खोतच्या (66) सात विकेट राखून पार पाडले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रणजीपटू तनुष कोटियन, सीसीआयचे उपाध्यक्ष (क्रिकेट) मयांक खांडवाला आणि एमएसएसए क्रिकेट सचिव नदीम मेमन यांच्या उपस्थितीत पार पडला.
Comments are closed.