सुप्रीम कोर्ट ए. राजाला दिलासा देते
नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने माकप आमदाराच्या निवडणुकीप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविला आहे. माकप आमदार ए. राजा यांच्या 2021 च्या निवडणुकीतील विजयाला अमान्य ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने ए. राजा यांच्या विरोधात दाखल याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने निवडणुक रद्द केल्याने ए. राजा यांना केरळ विधानसभा सदस्य म्हणून जे लाभ गमवावे लागले होते ते खंडपीठाने प्रदान करण्याचा निर्देश दिला आहे.
Comments are closed.