ए.आर. रहमानवर संगीताची धून चोरल्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगीतकारावर ए.आर. रहमान यांच्यावर गाण्यांच्या संगीताची धून चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. न्यायालयाने रहमानला मूळ संगीतकाराला श्रेय देण्यास सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या प्रकरणामुळे संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. रहमान यांच्यावर संगीत चोरीचा आरोप ध्रुपद शैलीचे शास्त्रीय गायक उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली.

उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी आरोप केला आहे की, ए.आर. रहमान यांनी मणिरत्नम यांच्या तमिळ चित्रपट “पोन्नियिन सेल्वन २” मधील “वीरा राजा वीरा” या गाण्यात त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या रचना “शिव स्तुती” चा एक भाग चोरला आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील सुरताल (एक विशेष प्रकारची लय) मध्ये ते गाणे त्यांनी तयार केले आहे, ती त्यांची स्वतःची रचना असल्याचा डागर यांचा दावा आहे. ती धून रहमान यांनी चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी केली. मुख्य न्यायाधीश म्हणाले की डागर वाणी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. संपूर्ण जग डागर कुटुंब आणि त्यांचे ध्रुपद संगीत ओळखते. ते पिढ्यानपिढ्या उच्च दर्जाचे कलाकार आहेत. न्यायमूर्ती बागची म्हणाले, “आम्हाला मूळची रचना कोणाची आहे याची चौकशी करायची आहे. फक्त गाण्याला संगीत दिल्याने ती रचना तुमची होत नाही. तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की यापूर्वी इतर कोणाकडेही अशी धून, रचना नव्हती.

रहमानचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन्ही न्यायमूर्तींना सांगितले की, “आम्ही कधीही कोणाच्याही रटनेवर हक्क सांगत नाही. पण जेव्हा माझे अशिल रहमान पारंपारिक शास्त्रीय संगीताचे भक्त आहेत. सरन्यायाधीश म्हणाले, हा असा खटला आहे, जिथे न्यायाधीशांनी हस्तक्षेप टाळायला हवा. हा दोन प्रसिद्ध संगीतकारांचा प्रश्न आहे. रहमानच्या वकिलाने पुढील सुनावणीसाठी त्यांचे अशिल रहमान यांच्याकडून सूचना मिळविण्यासाठी स्थगिती मागितली. त्यानंतर न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली.

Comments are closed.