भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर 'सुप्रीम' फाईल

अत्यंत चिंताजनक स्थिती असल्याची टिप्पणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत श्वानाच्या चाव्यानंतर रेबीज संक्रमणामुळे 6 वर्षीय मुलाच्या मृत्यूची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीजच्या घटनांविषयी प्रसारमाध्यमांमधील एका वृत्ताची सोमवारी स्वत: दखल घेतली आहे.

भटक्या श्वानांची समस्या अत्यंत त्रस्त करणारी आणि चिंताजनक आहे. अहवालात काही चिंताजनक आणि त्रस्त करणारी आकडेवारी अन् माहिती ाहे. दरदिनी दिल्ली तसेच त्याच्या बाहेरील भागांमध्ये श्वानांनी चावा घेतल्याच्या शेकडो घटना समोर येत आहेत. यामुळे रेबीजचा फैलाव होत असून अखेरीस मुले आणि वृद्ध या भयानक आजाराचे शिकार ठरत असल्याचे न्यायाधीश जेबी पारदीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

दिल्लीच्या सुल्तानपूर येथील पुठ खूर्द गावात काही दिवसांपूर्वी श्वानाने चावा घेतल्याच्या 24 दिवसांनी एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. मुलगी स्वत:च्या मावशीच्या घरी जात असताना भटक्या श्वानांनी तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. मुलीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु याच्या 20 दिवसांनी मुलीची प्रकृती बिघडू लागली, 23 जुलै रोजी मुलीचा मृत्यू झाला होता.

देशभरात समस्या, 37 लाख लोक ठरले शिकार

2024 या वर्षात श्वानांनी 37 लाखाहून अधिक लोकांवर हल्ला केला होता आणि रेबीजमुळे 54 जणांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षी श्वानांच्या दंशाची एकूण 37,17,336 प्रकरणे नोंद झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल यांनी संसदेत मागील आठवड्यात दिली होती.

Comments are closed.