माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबईत दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग टाकून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेचा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा, अशी मागणी केली आहे.
”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो. मीनाताईंचा हा अवमान आम्हा सर्वांसाठी अतिशय क्लेशदायक आहे. माझी शासनाला विनंती आहे की, या घटनेची सखोल चौकशी व्हावी. हे घृणास्पद काम करणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.
मुंबईत दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग टाकून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. काल रात्री अज्ञाताने लाल रंग टाकल्याचा संशय आहे. शिवसैनिकांकडून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शाखाप्रमुख अजित कदम यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शिवसैनिकांसह धाव घेऊन पुतळ्यावरील रंग पुसला आणि साफसफाई केली. हा रंग कोणी टाकला याचा तपास करावा. या घटनेची चौकशी पोलिसांनी तातडीने करावी, अशी मागणी करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Comments are closed.